Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj's
SHRI MULIKADEVI MAHAVIDYALAYA, NIGHOJ
Accredited by NAAC with "B" Grade

Seed Bank News

पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला वृक्ष लागवडीचा वसा.
पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ही भूमिका समोर ठेवून श्री मुलिकादेवी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी पावसाळ्यापूर्वी विविध वृक्षांच्या बियांच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी गेली वर्षभर विद्यार्थ्यांना सीड बँक तयार करण्यासाठी प्रेरित केले. चिंच, कडुलिंब, शंकासुर, गुलमोहर, शेवरी, काशीद, करंज, सीताफळ, जांभुळ, बोर, आंबा आदी वृक्षांच्या बियांचे संकलन गेली वर्षभर करण्यात आले. या बिया इकडे तिकडे फेकून दिल्यावर त्यांना कीड, मुंगी, कीटक आदी घटकांमुळे हानी पोहोचते. त्यामुळे त्यांची रुजवणूक होणे शक्य नसते. म्हणून विद्यार्थ्यांना बियांचे संकलन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या बियांची लागवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव गुंड या गावाजवळील डोंगरावर करण्यात आले.